Woolen business idea in marathi | वुलन उद्योग
वुलन उद्योगा मधे भारतात कुटीरोद्योग व लघुउद्योग म्हनुन हजारो लोक काम करतात. वुलनचे कपडे बनविन्यामधे स्त्रियांचा सहभाग मोठा आहे. भारतामधे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मिझोराम, नगालॅन्ड, जम्मु कश्मिर या राज्यामधे बहुतेक महिला वुलन पासुन कपडे तयार करण्याचा गृहद्योग करतात.
![]() |
| Add caption |
How to do business? | व्यवसाय कसा करावा?
स्वेटर, मफलर, सॉक्स, हातमोजे तयार करण्याचे मशीन भारतात मिळतात. एकाच मशीनवर विविध प्रकारच्या वुलनच्या कपड्यांचे विणकाम करता येते. अॅटोमॅटीक मशीन भारतातच तयार होतात व चांगल्या दर्ज्याच्या असतात. स्वयंचलित मशिनमुळे विणकाम वेगाने करता येते. अगदी अल्प शिक्षित लोकही थोड्याशा प्रयत्नाने हे विणकाम करु शकता. त्यामुळे अगदी कमी शिक्षण झालेल्या महिला व पुरुषाना हा व्यवसाय करता येतो. कोणत्या दर्जाचे मापाचे सुत व सुई घ्यायचे त्याच्यावर याच्या गेज ठरतात. मोठ्या स्टिच करिता मोठी व छोट्या स्टिच साठी छोटी डायल वापरावी लागते. मोठी साईज, मध्यम साईज, साधारण साईज, बारीक साईज, अत्यंत सुक्ष्म साईज अशा लोकरीच्या प्रकारानुसार किती नंबर डायल वापरायची ते ठरते. भारतामधे लोकरीपासुन धागा बनविणारे उत्पादक आहेत. आपण कोणते उत्पादन करायचे व याला कोणता धागा वापरावा लागतो याची पाहणी करुण त्या साईजचा धागा उत्पादक किंवा वितरकांकडुन खरेदी करावा. धाग्यांच्या विणकामासाठी पद्धत प्रशिक्षणाने शिकुण घ्यावे लागेल. स्टिचेस घालताना रंगसंगतीचा वापर केला जातो. आज वुलन उद्योगांतुन तयार कपड्याना परदेशी बाजारपेठही मिळालेली आहे. भारतात तयार झालेले वुलनचे कपडे पाश्चिमात्य देशांबरोबर आखाती देशातही निर्यातही केली जाते.
Market | बाजारपेठ
वुलन उद्योगाला आपल्या देशात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. प्रचंड मोठी लोकसंख्या असणार्या आपल्या देशात हिवाळा, पावसाळा व उन्हाळा असे तिन्ही ऋतु असतात. वुलनचे कपडे विकणारे होलसेल व कोरकोळ व्यापारी आहेत. त्याना त्यांच्या बाजारपेठेत मागणी असणार्या कपड्यांचा आपण पुरवठा करु शकतो. मॉल्स, कपड्यांची दुकाने, विक्री प्रदर्शने या ठिकाणी आपण त्या व्यापार्याना आपण कापडे पुरवु शकतो.

ConversionConversion EmoticonEmoticon