Garment business idea in marathi | गारमेंट व्यवसाय
मानवाची सदासर्वकाळ मूलभूत गरज असणारा व्यवसाय व उद्योग म्हणजे गारमेंट उद्योग व्यापार. माणूस जोपर्यंत आहे तो पर्यंत चालणारा , जगाच्या प्रत्येक देशातील, प्रत्येक ग्रामीण व शहरी भागात चालणारा हा व्यवसाय आहे. शासनाच्या बऱ्याचशा आर्थिक महामंडळाच्या योजना गारमेंट उद्योगा करिता तुम्हाला मदत करतात.
How to do business | व्यवसाय कसा करावा?
कपड्यांचे तागे आणून बाजारपेठेच्या, व्यापाऱ्याच्या मागणीप्रमाणे त्यांना हव्या असणाऱ्या डीजाईन चे , फॅशन चे कपडे शिवून देने हा गारमेंट चा उद्योगाचा प्रमुख भाग असतो. तुमच्या गावातील शहरातील आसपासच्या कापड बाजारपेठेतील व्यापाऱ्याना भेटून त्यांच्या दुकानात विकल्या जाणाऱ्या रेडिमेड कपड्यांच्या ऑर्डर्स आपण पूर्ण करू शकतो. शर्ट, पॅन्ट, चुडीदार,मुलींचे फॅशन ड्रेस,मुलांचे फॅशनेबल कपडे त्यांना हव्या असलेल्या डिजाईन व मापाप्रमाणे शिवून देता येतात. मोठ्या होलसेल व्यापारीनकडून एकाच नमुन्याच्या अनेक नगाच्या ऑर्डर्स आपल्याला मिळू शकतात. दहा ते 20 प्रशिक्षित महिला व पुरूष कामाला घेता येतात. गारमेंट उद्योगा मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे व्यापारी, कंपनीकडून ऑर्डर्स मिळवणे. काही कंपन्या स्वतःच कापड देऊन त्यांना हव्या त्या फॅशनचे डिजाईनचे कपडे बाहेरून तयार करून घेतात व आपल्या लोगो ब्रॅण्डनेमवर ते विकतात. त्यांच्याकडून ऑर्डर्स मिळवूनही आपल्याला चांगली मजुरी मिळवता येते.
1 Comments:
Click here for Commentsमला
ConversionConversion EmoticonEmoticon