Add

Motor training school business idea in marathi | मोटर ट्रेनिंग स्कुल



Motor training school | मोटर ट्रेनिंग स्कुल

आज च्या घडीला प्रत्येकाच्या घरी दुचाकी किंवा चार चाकी वाहन उभे असलेले दिसतेच. गेल्या दहा वर्षांत तर वाहनांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. काही काही शहरात तर वाहने लावायला जागा नसल्याने पार्किंग ही सुद्धा एक समस्या बनली आहे. दुचाकी वाहन असो किंवा चारचाकी, ज्याच्या त्याच्या ऐपती प्रमाणे, गरजेप्रमाणे आज वाहनांची खरेदी केली जाते. आता गाडी शिकण्याची आवड पण स्त्रियांना आहे. मुलांना शाळेत सोडण्यासाठी खूप महिला गाड्यांचा उपयोग करतात. हा व्यवसाय पण खूप चालतो व पैसे पण खूप कमवता येतात.



How to do business? | व्यवसाय सुरू कसा करायचा?

गावात किंवा शहरात मोटर ट्रेनिंग स्कुलचे ऑफिस सुरू करून त्याला एक चांगले नाव द्यावे. मोटर ट्रेनिंग स्कुल सुरू करण्याकरिता परवाना लायसन्स आपणास जिल्ह्याच्या आर टी ओ ऑफिस कडून मिळतो. एखादी second hand चार चाकी वाहन (मारुती 800) घ्यावी व एखादी सेकंड हँड स्कुटी(महिलांनकरिता) घेऊन हा व्यवसाय सुरू करता येतो. तुमच्या स्कुलची जाहिरात झाल्यानंतर तुमच्या कडे वाहन चालवणे शिकण्यासाठी ज्या व्यक्ती येतील त्यांच्या कडून तुम्ही 4000 ते 5000 रु घेऊन वाहन शिकवू शकता लक्षात ठेवा 4000 ते 5000 रु फक्त चारचाकी वाहना साठी दोनचाकी वाहना साठी वेगळा शुल्क आकारावा. गाडी शिकणार नवीन असल्यामुळे अपघात होण्याचा धोका हा असतोच म्हणून आपल्या गाडीत double system बसवून घ्यावी की जेणेकरुन तुम्ही शेजारी बसून सुद्धा गाडी control करू शकाल. गाडीचा इन्शुरन्स नक्की करून घ्यावा.   रोज एक ठराविक किलोमीटर गाडी चालवायला शिकवणे असा काही दिवस नित्यक्रम ठेवून व्यक्तीला वाहन चालीवण्यामध्ये पारंगत करणे असा हा मोटर ट्रेनिंग स्कुल चा उद्योग आहे.

Marketing | मार्केटिंग

तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग हे केबल नेटवर्क ला तुमची जाहिरात देऊन करू शकता तसेच लोकल वृत्तपत्रात जाहिरात देऊन पण करू शकता

खर्च
गाळा- 3000 ते 5000
चारचाकी वाहन-50000 ते 70000
दुचाकी वाहन-10000

Previous
Next Post »

1 Comments:

Click here for Comments
abhi
admin
January 1, 2019 at 10:34 PM ×

Best ideas

Congrats bro abhi you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar