Cable business idea in marathi | केबल नेटवर्क व्यवसाय
आजच्या जगात TV म्हणजे एक अतिशय महत्वाचा भाग आहे. मनोरंजन आणि माहिती मिळवण्याचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. श्रीमंतापासून ते गरिबांच्या घरात पण TV ही असते म्हणजे असतेच. TV पाहणे हे गरजेपेक्षा जास्त लोकांना व्यसनच लागलं आहे. सिनेमा पाहणे, सिरियल पाहणे इत्यादीचा उपयोग TV चा होतो. TV वर येणारी शेकडो चॅनेल्स ही केबलच्या माध्यमातून पाहता येतात. डिश सारखे उपकरणे जरी बाजारात असली तरी केबल TV सर्वांना परवडणारी व सोयीची असल्याने 80 टक्के लोकांकडे केबल TV पाहायला मिळते. याकरिता केबल नेटवर्किंग ऑफिस सुरू करून आवश्यक साधने व उपकरणे जोडावी लागतात. Satellite नेटवर्क कडून त्यांचे रिचार्ज व्हाउचर मारून अथवा पेमेंट भरून पासवर्ड घेऊन satellite चॅनेल सेवा उपलब्ध करून घ्यावी लागते. केबलच्या माध्यमातून घरोघरी केबलचे connection देऊन सेवा देता येते.
प्रत्येक घरात TV असल्याने एक सलग जवळपास सर्वच घरात तुमचे केबलचे connection लोक घेतात. जेवढी चॅनेल्स जास्त असतील तेवढी जास्त connection जोडणी होतात. सेवा शुल्क म्हणून महिन्याला एक ठराविक रक्कम आकारणी करून उत्पन्न मिळवता येते.
या व्यवसायाचे सुरवात प्रशिक्षण घेऊन करता येते किंवा अनुभवातून शिकता येते.
या व्यवसायात कामगार लागतात एक कॉम्पुटर operator दोन केबल जोडणारे व दुरुस्त करणारे कुशल कामगार व चार अकुशल कामगार असे 6 ते 7 जण कामगार लागतात.
ConversionConversion EmoticonEmoticon