Stationary business idea in marathi | स्टेशनरी उद्योग
पिढ्यानपिढ्या आपल्याकडे जे व्यवसाय केले जातात, त्या उद्योगांतुन किंवा व्यवसायातुन भारतीय लोक बाहेर पडत नाहित. डॉक्टरच्या मुलाने डॉक्टरच व्हावे किंवा शिक्षकाच्या मुलाने शक्यतो शिक्षकच व्हावे अशी मानसिकता असते. आपल्या शेजारील चीन, कोरिया, जपान, इंडोनेशिया सारख्या देशानी अगदी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे छोटे भाग घर उद्योगाना किंवा कुटिर उद्योगांच्या माध्यामातुन तयार करुन आपल्या देशाच्या अर्थव्यवस्ठेला मोठा हातभार लावला आहे. तुमच्याकडे जर अल्प भांडवाल असेल पन काही तरी करन्याचे ध्येय असेल तर छोटी उत्पादने बनवायच्या उद्योगांकडे वळा. स्टेशनरी साहित्य तयार करने हा त्यापैकी एक छोटा उद्योग आहे. स्टेशनरी साहित्यामध्ये मुख्यत्वे वह्या, पुस्तके, रजिस्टर, नोटबुक्स, अभ्यासाच्या इतर साहित्य येते.
How to do business? | व्यवसाय कसा करावा?
.स्टेशनरी साहित्या पैकी कोणते साहित्य करायचे ते सर्वात आधी ठरवा. बाजारपेठेत बारामहीनी मागनी असनारे साहित्य म्हणजे वह्या व नोट्बुक्स. वह्या तयार करण्याकरीता फारसे प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. प्रत्यक्ष वह्या तयार करण्याच्या कंपनीत थोडे दिवस काम करुण अनुभव घेता येतो. वह्या तयार करण्याचे रुलिंग मशीन, स्टिचींग मशीन, हैड्रॉलिक मशीन बाजारपेठेत विकत मिळतात. पुस्तके किंवा प्रिंटेड मॅटर छपाई करुन जर स्टेशनरी तयार करणार असाल तर मात्र प्रिंटिग मशीनची गरज भासत नाहि. वह्या तयार करणार असाल तर मात्र प्रिंटिग मशिनची गरज भासते. वह्या तयार करण्याकरिता एकरेघी, दोनरेघी, चाररेघी अशा प्रिंटेड कागदांचे बंडल कागदाच्या होलसेल व्यापार्याकडुन आणुन आपण त्याना स्टिचींग कटिंग, बायडींग, अशा प्रक्रिया करुण वह्यांचे उत्पादन करु शकतो.
Market | बाजारपेठ
घरांपासुन कार्यालायापर्यंत सर्वत्र वह्यांची अवश्यक्यता भासते. सर्वात जास्त वह्यांचा वापर विद्यार्थी वर्ग करतो. विद्यार्थ्याना लागनार्या वह्या वगैरे स्टेशनरी त्यांचे पालक दुकानातुन खरेदी करतात. तसेच तुम्ही तुमचा माल हा होलसेल व्यापर्याला पण विकु शकता.

ConversionConversion EmoticonEmoticon