Add

Ethanol business idea in marathi | ईथेनॉल निर्मिती उद्योग

Ethanol business idea in  marathi

जगाच्या आधुनिकीकरणाबरोबर भारताचेही आधुनिकीकरण झाले. जगातील द्वितीय लोकसंख्या असणार्‍या भारतात औद्योगिकरणाचा विकास झाला. याच्यामुळे देशात दळणवळण वाढले. वाहनांची संख्या पण खुप वाढली. रस्ते विकास महामंडळाने केलेल्या रस्त्यांचे चौपदरी करणाबरोबर केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास योजने अंतर्गत ग्रामीण भागातही पक्क्या रस्त्यांचे जाळे निर्माण झाले. दुचाकी चारचाकी वाहनांकरिता लागणार्‍या एकुण इंधना पैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के इंधन आपण आखाती देशांकडुन आयात करतो. पेट्रोल, डिझेल, क्रुड ऑईल यासारखी विविध इंधने अरबी देशांकडुन आयात करतो. याला पर्याय म्हणुन इथेनॉल व बायोडीझेल सारखी इंधने तयार केली जाऊ लागली आहेत.

How to do business? | व्यवसाय कसा करावा?


डोंगर उतारावर पडीक जमिनीत हजारो एकरांवर आज बायोडीझेलसाठी लागनार्‍या वनस्पतींची लागवड करुन त्यांच्या बियांपासुन बायोडिझेलची निर्मिती केले जाते. महामार्गाच्या शेजारी काहि ठिकाणी बायोडीझेल विक्रिचे पंप डिझेल विक्री करताना दिसुन येत आहेत. साखर कारखान्यामधे साखर व अल्कोहोल उसावर प्रक्रिया करुन बनवले जातात. तसाच इथेनॉल निर्मितीचा प्रोजेक्ट आहे. केंद्र शासनाने पेट्रोल व डीझेल विक्री करनार्‍या पेट्रोल पंपाना प्रती लिटर दहा टक्के इथेनॉलचा वापर करुन विक्री करणेस परवानगी दिली आहे. इथेनॉल ची फक्त कल्पना इथे तुम्हाला देण्यात आली आहे. संपुर्ण माहिती तज्ञांकडुन करुन घ्यावी.

Maraket | बाजारपेठ

प्रत्येक पेट्रोल पंप विक्रेत्यास इथेनॉल विकता येईल. त्याबरोबरच इथेनॉलची विक्री करणारे घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी आहेत त्यानाही मालाचा पुरवठा करता येईल. 
Previous
Next Post »

1 Comments:

Click here for Comments
Ams Digital
admin
September 2, 2021 at 3:23 AM ×

thanks for sharing a great article post in this page. It's very nice write-up in page. You can visit here for know about 5 key points to upgrade your local business and search engine marketing agency in delhi

Congrats bro Ams Digital you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar