Add

Event management business idea in marathi | इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय



Event management business idea in marathi | इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय

जसे जसे जगाचे अधुनिकरण झाले तसे तसे लग्नासारख्या कार्यक्रमात पाहुण्यांना मदत करण्यासाठी कुणाकडे वेळच नाही. लग्न किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आल्यानंतर नातेवाईक, पाहुणे, मित्र मंडळ कार्यक्रमाला औपचारिक हजेरी लावतात. लग्नासारखे कार्यक्रम म्हणजे बरीच नियोजने करावी लागतात. घरातील मुख्य कर्त्या माणसाला ही सर्व नियोजने करताना खूप त्रास होतो आणि जर का घरचा कर्ता माणूसच नोकरदार किंवा व्यवसायिक असेल तर मात्र मग अशा कार्यक्रमांचे नियोजनाचा बोजवारा उडतो. बाकीची सर्व मंडळी ही त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असतात. आपण फक्त व्यवस्तीत त्यांना management करून द्यायचे म्हणजेच इव्हेंट management व्यवसाय होय.

How to do business | व्यवसाय सुरु कसा करायचा

प्रत्येक घरा मध्ये असे कार्यक्रम कधीना कधी असतातच त्या कार्यक्रमांचे management करण्याचे काम मिळवण्यासाठी स्वताचे एक छोटेसे ऑफिस सुरू करायचे, ऑफिस च्या नावे विसीटिंग कार्ड बनवावे. कामच्या व्याप्ती प्रमाणे मालकाच्या खर्चाच्या बजेट प्रमाणे कार्यक्रमाचा खर्च बसवावा. एकूण खर्चाच्या 15 ते 20 टक्के ज्यादा रकमेचे कॉन्ट्रॅक्ट करायचे. जेवण, मांडव, लाइटिंग, वरात अशी सर्व कामे भाडेतत्त्वावर करुन घ्यावीत. जेवण बनवण्यासाठी आचारी, वाढण्यासाठी वाढपी यांची सोया करावी. लग्नात लागणारे सर्व भांडी घ्यायचे. अशी सर्व कामगारांपासून साहित्यापर्यंतचे नियोजन आपण करायचे व आपले सेवा शुल्क हे ठराविक घ्यायचे.


Marketing | मार्केटिंग

या व्यवसायाचे मार्केटिंग लोकल केबल वर जाहिरात देऊन करावे. तसेच लग्नकार्यालये, वर-वधू सूचक संस्था, राजकीय कार्यकर्ता यांना आपली माहिती द्यावी. अश्या प्रकारे तुम्ही मार्केटिंग करू शकता.


Expenses | खर्च 

मांडव
लाइटिंग चे साहित्य
स्पीकरसेट
भांडी सेट
आचारी
कामगार

Previous
Next Post »