फोटो स्टुडिओ business ideas in marathi:
फोटो स्टुडिओ चा व्यवसाय हा खूप मोठा व्यवसाय आहे. आणि हा व्यवसाय खूप वर्षांपासून सुरू आहे. हमखास यश देणारा, कोठेही नुकसान न करणारा हा व्यवसाय आहे. Training घेतल्यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. फोटो हा जसा कुतूहलाचा विषय आहे तसा तो इंटरेस्टिंग व्यवसाय ही आहे. आता प्रत्येक घरात जरी camera असला तरी तो फोटो डेव्हलप करण्यासाठी स्टुडिओ मध्ये जावेच लागते. आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असो, वाढदिवस असो, लग्न समारंभ असो,स्नेहसंमेलन असो अशा कार्यक्रमात फोटो हमखास काढले जातात. शासकीय कामे करताना, बँकेत खाते उघडताना, आयकार्ड साठी, पासबुक साठी, फोटो हे लागतातच आणि हे फोटो स्टुडिओ मध्ये काढले जातात. आपण काढलेले फोटो आणि एका फोटोग्राफर ने काढलेले फोटो यांच्यात खूप फरक असतो. कोणत्या अँगल मधून चांगला फोटो काढता येतो, कोणती व्यक्ती कोणत्या पोज मध्ये चांगली दिसते, त्यांच्या पाठीमागे बॅकग्राऊंड काय असावे याचे चांगले ज्ञान हे फोटोग्राफर ला असते. आपण जर फोटोग्राफी, फोटो developing, विडिओ शूटिंग,अलबम मेकिंग यांचे प्रशिक्षण घेतले तर अनुभवाने तुम्ही एक उत्तम फोटोग्राफर होऊ शकता.व्यवसाय कसा सुरू करायचा
या व्यवसायासाठी 10 बाय 15 ची जागा किंवा दुकानगाळा लागेल. जेथे स्टुडिओ सुरू करायचा आहे ती जागा बाजार पेठेत रोड टच असावी. हा व्यवसाय ग्रामीण किंवा शहरी भागात सुरू करता येतो. उत्तम फोटोग्राफर होण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण चांगले घेतले पाहिजे. फोटो काढताना कोणत्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व कोणत्या बाजूने शोभून दिसेल याचा अभ्यास करावा. आपण सुंदर दिसावे असे सर्वांना वाटत असते. त्यामुळे ज्यांचा फोटो काढायचा आहे, ती व्यक्ती ज्या अँगल ने सुन्दर दिसेल तो अँगल तपासून पहावा आणि फोटो काढावे.
1 Comments:
Click here for CommentsGreat posting and nice collection thanks admin
Best Business Ideas for Rural Areas in india
For More Information
RNFIServices
sales@rnfiservices.com
+918560900500
ConversionConversion EmoticonEmoticon